Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार?

चेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार?

वेबदुनिया

WD
सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतील अर्धा टप्पा संपला असून मंगळवारी येथे पुणे वॉरिअर्स आणि आयपीएलमधील आघाडीचा संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

पुणे संघाने यापूर्वी 15 एप्रिल रोजी चेन्नईचा 24 धावांनी पराभव केला होता. चेन्नईच्या मैदानावर पुणे संघाने हा विजय मिळविला होता परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. चेन्नईचा संघ साखळी गुणतक्त्यात 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. चेन्नईने 9 सामन्यातून 7 विजय मिळविलेले आहेत व फक्त दोन सामने गमावले आहेत. याउलट पुणे संघ नवव्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहे. पुणे संघाने फक्त दोन विजय मिळविले असून 7 सामने गमावले आहेत. यावरून पुणे संघ हा पिछाडीस पडत गेला आहे, हे दिसून येत आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट राडर्सचा 14 धावांनी पराभव केला तर दिल्ली संघाने पुणे वॉरिअर्सचा 15 धावांनी पराभव केला. चेन्नई संघाने कोलकाताविरुध्द 200 धावसंख्या केली होती तर पुणे संघ दिल्लीविरुध्द 4 बाद 149 धावा करू शकला. त्यामुळे पुण्याची फलंदाजी अद्याप क्लिक झालेली नाही. मायकेल क्लार्कने आयपीएलमधून अंग काढून घेतले. नियमित कर्णधार अँजेलो मॅथूजला दुखापत झाली तर नूझीलंडच्या रॉस टेलर याला सूर सापडलेला नाही. सध्याच्या प्रभारी कर्णधार अँरॉन फिन्च याच्या मार्गदर्शनाखाली पुणे संघ जबरदस्त संघर्ष करीत आहे परंतु त्यांना विजय मिळविता येत नाही.

वॉरिअर्स संघाच्या खेळण्यात सातत्य राहिलेले नाही. सर्व विभागात तो खाली राहिला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या बाबीतही तो पिछाडीस पडला आहे. चेन्नईकडून माइक हसीला सूर गवसला आहे. व त्याने एकहाती विजय चेन्नईला मिळवून दिले
आहेत.

चेन्नई संघात धोनीशिवाय अश्विन, जडेजा हे अनुभवी खेळाडू आहेत. तसेच शादाब जकाती, बद्रीनाथ, सुरेश रैना असे फलंदाज आहेत. पुणे संघाला अलीकडेच सूर सापडला आहे. युवराज सिंग आणि लुक राइट ही जोडी जमली होती ते दोघे बाद होताच दिल्लीने उर्वरित खेळाडूंना रोखून विजय मिळविला. त्यामुळे एकंदरीत विचार केला तर हा एकतर्फी सामना होऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi