चेन्नईत श्रीलंकन खेळाडूंना मनाई!
आयपीएल आणि वाद यांचे सख्ख्य यावेळीही कायम आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चेन्नई येथे खेळल्या जाणार्या लढतींमध्ये श्रीलंकन खेळाडूंना सहभागी होण्यास मनाई केली. जयललिता यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठविलेल्या पत्रात राजकीय दबावामुळे श्रीलंकन खेळाडूंचे यमजानपद भूषविण्यास नकार दर्शविला.राजकीय दबावाखाली आयपीएल संचालन परिषदेने श्रीलंकेच्या १३ खेळाडूंना चेन्नईमध्ये खेळण्यास मनाई केली. त्यापैकी तीन खेळाडू आपापल्या संघांचे कर्णधारपद भूषवीत आहेत. चेन्नईमध्ये दोन एलिमिनेटर लढतींसह एकूण १0 सामने खेळले जाणार आहेत. मुंबई क्रि केट संघटनेने केकेआर संघाचा मालक शाहरुख खानवरील बंदीचा निर्णय कायम राखला. गेल्या वेळी मैदानावर प्रवेश करताना सुरक्षा रक्षकांसोबत हाणामारी केल्याचा शाहरुखवर आरोप आहे. त्यानंतर एमसीएने शाहरुखवर पाच वर्षांची बंदी घातली.