इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेमुळे झटपट मनोरंजनाचे ट्वेंटी-20 क्रिकेट प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार झाले असताना कसोटी क्रिकेटला प्रेक्षकवर्ग लाभण्याबद्दल पाक्सितानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने शंका व्यक्त केली आहे.
डेक्कन चाजर्स स्पर्धेतून बाहेर पडल्याने देशात परतल्यानंतर त्याने लीगला अतुलनीय यश लाभले असून लोकांचे समर्थन व उत्साह आश्चर्यचकित करणारा असल्याचे त्याने म्हटले आहे.
स्पर्धेत आमच्या संघाने निराशाजनक कामगिरी केल्यानंतरही शेवटच्या सामन्यात प्रचंड गर्दी होती, यातून आयपीलमुळे निर्माण झालेल्या उत्ताहाचा अंदाज येईल. ट्वेंटीच्या प्रसिद्धीमुळे एकदिवसीय क्रिकेटवर परिणाम होणार काय याबाबत सांगू शकत नसल्याचे स्पष्ट करताना कसोटीस फटका बसू, असे तो म्हणतो.