मुख्य निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांच्याकडे इंडियन प्रीमियर लीगने क्रिकेट ऑपरेशन्सच्या संचालकपदाचा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे. वेंगसकर यांचा निवडी समितीवरील कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपृष्टात येणार आहे. मात्र वेंगसरकर यांनी यावर वक्तव्य देण्याचे टाळले.
त्यांना एक कोटीची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त आहे. आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमन यांनीही याप्रकरणी संपर्कास नकार दिला.
मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मान्यता नसलेल्या कोणत्याही लीग सोबत जुळू नये ही अट ठेवून वेंगसरकरांकडे प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे मंडळाच्या सूत्राकडून स्पष्ट झाले.
करारादरम्यान व त्यानंतर दोन वर्षांपर्यंत इतर ते कोणत्याही लीगशी कार्य करू शकणार नाही. त्यांनी प्रस्ताव स्वीकारल्यास ते मंडळासोबत कार्यरत राहतील.