Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनी-भज्जीने फसवले श्रीसंथला...

धोनी-भज्जीने फसवले श्रीसंथला...
, गुरूवार, 16 मे 2013 (13:48 IST)
FILE
कोची. आयपीएल स्पॉट फिक्सिंग मध्ये अटक झालेला क्रिकेटपटू श्रीसंथच्या वडिलांनी भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि हरभजन सिंह यांनी षडयंत्र रचून श्रीसंथला फसवल्याचा आरोप केला आहे.

श्रीसंथला धोनीचे राज माहीत आहे. म्हणूनच आपल्या मुलाची कारकीर्द संपृष्टात आणण्यासाठी त्याने षडयंत्र रचल्याचे त्यांनी मल्यालम मनोरमास सांगितले.

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी श्रीसंथचे समर्थन केले असून आपण त्याला चांगले ओळखतो व प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याला दोषी ठरवता येणार नसल्याचे म्हटले आहे.

श्रीसंथ सहित राजस्थान रॉयल्सच्या तीन क्रिकेटपटूंना दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात अटक केली आहे. बीसीसीआयने प्रकरणात त्वरित कारवाई करताना तिघांनाही निलंबित केले आहे. (वृत्तसंस्था)

Share this Story:

Follow Webdunia marathi