Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाइट राइडर्सचा फुसका बार, डेक्कन चार्जर्स विजयी

नाइट राइडर्सचा फुसका बार, डेक्कन चार्जर्स विजयी

वेबदुनिया

आयपीएलच्या दुसर्‍या सत्रात नाइट रायडर्सच्या कर्णधारपदावरून सौरव गांगुलीला डच्चू दिल्यानंतरही बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवणार्‍या किंगखान शाहरूखचा संघ मात्र क्रिकेटच्या मैदानावर अपयशी ठरला असून डेक्कन चार्जर्सने त्यांचा आठ गडी राखून मोठा पराभव केला.

शाहरूख बॉलीवूडमध्ये जितका चर्चेत असतो तितकाच आयपीएलमध्येही तो चर्चेत राहत असतो. त्यासोबत आपला संघही नवीन क्लृप्त्या योज‍त असतो. मात्र आजच्या सामन्यात डेक्कन चार्जर्सने नाइट रायडर्सला डिसचार्ज केले.

कोलकता नाइट राइडर्सने नाणे फेक जिंकून आधी फलंदाजी करून 19.4 षटकात सर्वबाद 101 धावांचे आव्हान ठेवले. कार्तिक 10 धावावर नाबाद राहिला. कर्णधार मॅकलमला अवघ्या 1 रनवर आरपी सिंगच्या चेंडूवर गिलक्रिस्टने झेलबाद केले. गाइलेने चांगले स्ट्रोक लावत असतानाच 10 धावावर सिंगच्या चेंडूवर हरमीत सिंगने त्याला झेलबाद केले. माजी कर्णधार बंगाल टायगर करून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र गांगुलीला(1) हरमीतने तंबूत परत पाठवले. चोप्राला 11धावावर ओझाच्या चेंडूवर गिलक्रिस्टने गुंडाळले. शुक्ला हा ही 8 धावावर ओझाने बाद केले. आगरकर सात धावावर पायचीत झाला. हॉजला (31) धावावर स्टाइरिसने तंबूत पाठवले. इशांत शर्माचा आरपी सिंगने त्रिपळा उडवला. आरपी सिंगने चार, ओझाव स्टाइरिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हरमीत सिंग को एक गडी बाद करण्याची संधी मिळाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi