आयपीएलच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार सौरव गांगुलीच्या शानदार 86 धावांच्या (नाबाद 53 चेंडूत) आणि उमर गुलच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्ज इलेव्हनचा दोन चेंडू व तीन गडी राखून पराभव केला. या विजयामुळे त्यांनी स्पर्धेतील आपली विजयी सांगता केली.
पंजाब संघाकडून कुमार संघकारा (64) आणि शान मार्श (40) यांनी पुन्हा शानदार खेळ केला. परंतु, उमर गुलने 23 धावा देऊन चार बळी मिळवून नाइट रायडर्सला विजय मिळवून दिला. गांगुलीने 53 चेंडूत सहा षटकार आणि सहा चौकाराच्या मदतीने 86 धावांचा खेळ करत संघाला 19.4 षटकात विजय मिळवून दिला.
सामना जिंकण्यासाठी 26 चेंडूत 69 धावांची आवश्यकता असताना गांगुलीचा आक्रमक खेळ आणि गुलने 11 चेंडूत 24 धावा करून निसटता सामना जिंकून दिला. संघाची संयुक्त मालकीण जुही चावलाने उमर गुलला 'मॅन ऑफ द मॅच' च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, सर्वात जास्त षटकारांसाठी गांगुलीला पुरस्कार देण्यात आला.