आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा येथील चेपक स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात दहा धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महाग पडल्याचे कारण कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.
सामन्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. गरम हवामानामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यास कठीण गेल्यामुळे पराभव झाला.
आता, केवळ 27 मेला डेक्कन चार्जर्सविरूद्ध होणार्या सामन्यात विजय प्राप्त करायचा असून त्यांच्याविरूद्ध विजय मिळविला तरच आम्हांला उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश मिळण्याची संधी आहे.