नॅशनल जिओग्राफीवर आयपीएलचे वृत्तचित्र
इंडियन प्रीमिअर लीगचे भडक आणि ग्लॅमर लवकरच नॅशनल जिओग्राफिक वाहिनीचा भाग बणनार आहे. या वाहिनीने कोठ्यावधी डॉलर्सची उलाढाल होणार्या या टी-20 स्पर्धेवर वृत्तचित्र प्रदर्शित करण्याचे ठरविले आहे. बीसीसीआयच्या वक्तव्यानुसार, भारतीय दूरचित्रवाणी इतहासात प्रथमच नॅशनल जिओग्राफिक वाहिनी भारतीय क्रिकेटप्रेमींना आयपीएलची पडद्यामागची कहाणी सांगणार आहे.