Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पठाणने दिले नाइट रायडर्सला फटके

पठाणने दिले नाइट रायडर्सला फटके
युसुफ पठाणच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने कोलकता नाईट रायडर्सचा सुपर ओव्हरमध्ये धुव्वा उडवत पराभव केला.

सामन्यात टाय झाल्यामुळे 'सुपर ओव्हर'चा निर्णय घेण्यात येऊन प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्सने १५ धावा केल्या. गोलंदाज मेंडिसच्या फिरकीवर ६, २, ६, ४ असे शॉट फिरकावून मैदानात धावाचा पाऊस पाडणार्‍या युसुफ पठाणने आपल्या संघाला विजय मिळवून दिला

राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या १५१ धावाच्या आव्हानाचा पाठलाग करत नाइट रायडर्सने बरोबरी साधल्याने दोन्ही संघात टाय झाला. क्रिस गेल व बंगाल टायगर सौरव गांगुलीने शानदार कामगिरी केली.

राजस्थान रॉयल्सकडून मॅस्करेन्हसने एक, शेन वॉर्नने दोन तर कामरान खानने तीन गडीला बाद करून नाइट रायडर्डला मार्गातच बरेच अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अंत‍िम व निर्णायक क्षणात नाइट रायडर्सदे राजस्थान रॉयल्सने बरोबरी साधली.

Share this Story:

Follow Webdunia marathi