पुणे वॉरियर्सने आयपीएल सोडले
, मंगळवार, 21 मे 2013 (19:23 IST)
सहारा समुहाचा क्रिकेट लीग संघ पुणे वॉरियर्सने आयपीएल सोडले आहे. बीसीसीआय सोबत बँक गॅरंटीवरून वाद झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. पुणे वॉरियर्स संघ आयपीएल मधील सर्वात महागडा संघ असून सहारा समुहाने तब्बल 1700 कोटींना फ्रँचायसी खरीदली आहे. यापोटी त्यांना बीसीसीआयला दरवर्षी 170 कोटी रूपये द्यावे लागतात. सहारा ग्रुप सद्यपरिस्थितीत प्रचंड आर्थिक अडचणीतून जात असल्याने बहुदा त्यांना आयपीएलमध्ये फ्रँचायसी कायम ठेवणे अशक्य झाले असणार. त्यातच बीसीसीआय सोबत वाद झाल्याने त्यांनी अखेर आयपीएल मधून नाव बाहेर घेतले. पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त आले आहे. पुणे वॉरियर्स संघ यंदाच्या हंगामात अंकतालिकेत शेवटून दुसर्या स्थानावर राहिला आहे.