Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलार्डच्या ‘त्या’ नृत्यावर राहुल द्रविडची टीका

पोलार्डच्या ‘त्या’ नृत्यावर राहुल द्रविडची टीका

वेबदुनिया

PR
मुंबई-राजस्थान या आयपीएल सामन्यात शेन वॅटसन बाद झाल्यानंतर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू केरॉन पोलार्ड याने वॅटसनला निरोप देताना नृत्य केले आणि हे नृत्य टीकेचे लक्ष्य बनले आहे.

डावखुरा मंदगती गोलंदाज प्रगन ओझाच्या चेंडूवर वॅटसनने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलार्डने हा झेल उत्तमरीत्या पकडला. वॅटसन बाद झाल्यामुळे मुंबईच विजयातील अडथळा दूर झाला, असे समजून पोलार्डने मैदानावर नृत्य केले. याबाबत बोलताना राजस्थान संघाचा कर्णधार द्रविड याने हे कृत्य भ्याडपण्याचे आहे, असे म्हटले आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. फलंदाज बाद झाल्यावर तो तुम्हाला कधीच प्रतिसाद देत नाही. परंतु, तुम्ही मात्र त्याला सेंडऑफ देता, असे द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितले. क्रीडांगणावरील सामना सुरू असतानाचे कोणतेही कृत्य हे खेळाचा भाग बनते. वानखेडे स्टेडियम हे झालेले कृत्य योग्य नव्हते. ज्यावेळी वॅटसन फलंदाजीला आला, त्यावेळी पोलार्डने त्याच्याशी संभाषण केले. या दोघात शाब्दिक चकमकही उडाली. त्यानंतर, वॅटसन बाद होताच हा प्रकार घडला. पंचाना ही परिस्थिती अधिक चांगल तर्डेने हाताळता आली असती. ट्वेंटी-20 स्पर्धा ही स्पर्धात्मक आहे आणि ही कठीणही आहे. त्यामुळे अशा घटना घडतात. याचे आशर्च्य वाटले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi