आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाने बुधवारी रॉयल्स चॅलेंजर्सचा नऊ गडी व 12 चेंडू राखून सहज पराभव करत विजयी सांगता केली. परंतु, उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न अधुरेच राहीले.
सामन्यादरम्यान आलेल्या पावसामुळे हा सामना प्रत्येकी 18 षटकाचा खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करणार्या रॉयल चॅलेंजर्सला दिलहारा फर्नांडो आणि ड्वेन स्मिथच्या गोलंदाजीपुढे केवळ 122 धावांत गुंडाळले.
मुंबईपुढे विजयासाठी ठेवलेल्या 123 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने एक गडी गमावून सहज विजय प्राप्त केला. जयसूर्याने 37 चेंडूत चार षटकार व चार चौकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर सचिनने चार चोकाराच्या मदतीने नाबद 40 धावा काढल्या.
सचिन जयसूर्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 11.6 षटकात 96 धावांची भागिदारी केली.