Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजस्थान-पंजाब संघात आज झुंज

राजस्थान-पंजाब संघात आज झुंज

वेबदुनिया

PTI
यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉल्स या दोन संघात गुरुवार 9 मे रोजी येथे सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वपूर्ण असा साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

राजस्थान संघाने मंगळवारी दिल्लीचा 9 गडी राखून पराभव केला व साखळी गुणतक्यात तिसर्‍या स्थानावर उडी घेतली आहे. या संघाला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी आणखी विजयांची रज आहे. पंजाब विरुद्ध विजय मिळवून ‘प्ले ऑफ फेरी’ पक्की करण्याचा राजस्थानचा इरादा आहे. पंजाब संघसुद्धा 10 गुणांसह सहाव स्थानावर आहे. परंतु, त्यांचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे पंजाबलासुद्धा ‘प्ले ऑफ फेरी’ गाठणची संधी आहे.

पंजाबला डेव्हिड मिलेरच्या रूपाने एक नवा फलंदाज लाभला आहे व त्याने जबरदस्त असे शतक 38 चेंडूंवर पूर्ण केल्यामुळे पंजाबने बंगळुरूचा पराभव केला होता. बंगळुरूने 191 धावांचे उद्दिष्ट देऊनसुद्धा मिलेरमुळे पंजाबने ते सहजपणे पार केले. त्यामुळे तो किलर- मिलेर ठरला आहे. राहुल द्रविडचा संघसुद्धा मजबूत असा आहे. द्रविड आणि राहाणेची जोडी जमली आहे. याशिवाय शेन वॅटसन हा अष्टपैलू या संघात आहे.

दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले असून ते जोरदार झुंज देतील, अशी अपेक्षा आहे. पंजाबची मदार दक्षिण आफ्रिकेचा मिलेर, ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आणि मनदीपसिंग यांच्यावर राहील. राजस्थानची मदार द्रविडवर असेल. डेव्हिड हसी हा पंजाबचे नेतृत्व करीत असून नियमित कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा संघाबाहेर राहणे पसंत करीत आहे.

आयपीएलच्या नियमाप्रमाणे चार परदेशी खेळाडू अकराच्या संघात घेता येतात. त्यामुळे आपल्यापेक्षा सरस खेळाडूला संधी मिळावी, म्हणून हे कर्णधार संघाबाहेर बसणे पसंत करतात.

रिकी पोन्टिंग, कुमार संगाकारा आणि अॅडम गिलख्रिस्ट हे तीन कर्णधार बहुतांशी सामन्यात बाहेर बसलेले आहेत. गोलंदाजीत मात्र दोन्ही संघाची बाजू समसमान अशीच आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार व अटीतटीचा ठरण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi