गत विजेते राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता संघात दूस-या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंटमध्ये गुरुवारी होणा-या लढतीत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न हे पुन्हा एकदा समोर असणार आहेत.
वॉर्न आणि गांगुली यांच्यातील मैदानी लढ्यात यावेळी कोणत्या संघाची बाजू भक्कम आहे, हे सांगणे कठीण आहे. कारण दोन्हीही संघ आतापर्यंत चांगला खेळ करू शकलेले नाहीत. कोलकाताचे खेळाडू आपल्या पहिल्याच सामन्यात गेल्यावेळचा सर्वांत हाराकिरीचा संघ हैदराबाद कडून पराभूत झाले आहेत. तर दुस-या सामन्यात पावसाच्या कृपेमुळे ते पंजाब संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरले आहेत.