आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सविरूद्ध सोमवारी होणार्या सामन्यात कडवी झुंज देण्यासाठी आपला संघ तयार असल्याचे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने सांगितले.
राजस्थान रॉयल्सवर विजय मिळविण्यास आपला संघ पूर्ण क्षमतेने मैदानात उतरणार असल्याचे त्याने सांगितले. तेंडूलकर आणि वॉर्न मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. परंतु, मैदानावर दोघांत चांगले युद्ध होत असते. या युद्धात सचिनने नेहमी बाजी मारली आहे.
वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु, उद्याच्या सामन्यात दोघेही आंतरराष्ट्रीय खेळाडू एकमेंकाचे आव्हान स्विकारण्यास तयार असतील. वॉर्न एक महान गोलंदाज असून मला त्याच्या आव्हानाचा सामना करण्यास आनंद वाटत असल्याचे सचिनने सांगितले.