Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना

CSK vs RCB Cricket
, शुक्रवार, 22 मार्च 2024 (14:53 IST)
22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. दोन्ही संघ मोठ्या बदलांसह या सामन्यात उतरतील. आता रुतुराज गायकवाड सीएसकेचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे तर आरसीबी फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली नव्या नावाने खेळताना दिसणार आहे. 

आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेत रुतुराज गायकवाडची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. महेंद्रसिंग धोनी आगामी स्पर्धेत चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार नाही
 
धोनीने 212 सामन्यांमध्ये चेन्नईचे नेतृत्व केले आहे. यातील 128 सामन्यात संघाने विजयाची तर 82 सामन्यात पराभवाची चव चाखली. त्याचवेळी दोन सामने अनिर्णित राहिले. चेन्नईने गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला होता. 
 
शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. चेन्नई या मोसमातील पहिला सामना जिंकून त्यांचे मागील विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल
 
RCB आणि CSK यांच्यातील IPL 2024 चा पहिला सामना शुक्रवार, 22 मार्च रोजी होणार आहे.
आरसीबी आणि सीएसके यांच्यातील लीगमधील पहिला सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हे सीएसके चे होम ग्राउंड आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 08.00 वाजता होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 07.30 वाजता होईल. 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Anna Hazare: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया, म्हणाले-