लखनौ सुपरजायंट्सचा आयपीएल प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सशी सामना करावा लागणार आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत एका सामन्याच्या निलंबनानंतर या सामन्यातून परतणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्लीला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. IPL 2024 चा 64 वा सामना दिल्ली आणि लखनौ यांच्यात मंगळवार, 14 मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 07.30 वाजता होणार. नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल.
बुधवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या10 विकेट्सच्या पराभवानंतर संघ मालकाने के एल राहुलला फटकारले होते. लखनौचा संघ 12 गुणांसह सातव्या स्थानावर आहे आणि सध्या दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सह अव्वल चारच्या बाहेर आहे. दिल्ली आणि आरसीबीचेही 12-12 गुण आहेत
क्विंटन डी कॉकच्या खराब फॉर्ममुळे, सुपरजायंट्सला चालू हंगामात पॉवरप्लेमध्ये संघर्ष करावा लागला आहे, त्यामुळे मार्कस स्टॉइनिस आणि निकोलससारख्या खेळाडूंवर खूप दबाव आहे. एका सामन्याच्या निलंबनानंतर कर्णधार ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे दिल्ली संघाला बळ मिळणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
दिल्ली कॅपिटल्स: जॅक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, शाई होप, रसिक सलाम , कुलदीप, मुकेश कुमार, खलील अहमद.
लखनौ सुपरजायंट्स: केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, कृष्णप्पा गौतम, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन उल हक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या.