Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

IPL 2024 MI vs LSG:  आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल
, शुक्रवार, 17 मे 2024 (18:35 IST)
IPL 2024 मधील 67 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. या मोसमातील मुंबईचा हा शेवटचा सामना आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून संघाला सीझन-17 च्या मोहिमेचा शेवट करायचा आहे.मुंबईसाठी रोहितचा हा शेवटचा आयपीएल सामना असेल असे चाहत्यांना वाटते.
 
रोहितने आयपीएल 2024 मध्ये चांगली सुरुवात केली होती पण नंतरच्या काही सामन्यांमध्ये हिटमॅनचा खेळ चांगला झाला नाही. या हंगामात, रोहितने सीएसकेविरुद्ध अप्रतिम शतक झळकावले होते, तेव्हापासून हा हिटमॅन सतत फ्लॉप ठरत आहे. आज मुंबई इंडियन्स या मोसमातील शेवटचा सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचा आयपीएलमधील मुंबई इंडियन्ससाठी हा शेवटचा सामना असू शकतो, असे चाहत्यांना वाटते.
 
या हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि हा संघ प्रथमच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. आत्तापर्यंत मुंबईने 13 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 4 सामने जिंकले असून 9 सामने गमावले आहेत. सध्या मुंबई पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. मुंबईच्या खराब कामगिरीबाबत कर्णधार हार्दिकवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हार्दिकला त्याच्या खराब कर्णधारामुळे प्रत्येक सामन्यात ट्रोल करण्यात आले आहे.

Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या