शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरोचा आहे. गुजरातला बाद फेरी गाठण्याची शक्यता जीवनात ठेवण्यासाठी त्यांना जिंकावे लागणार.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचे 10 सामन्यांतून आठ गुण आहेत आणि ते आठव्या स्थानावर आहेत.या दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी जिकावे लागणार.
आरसीबी संघातील या हंगामात 500 धावा करणारा विराट कोहलीला पुन्हा ऑरेंज कॅप मिळवायची आहे. आरसीबीसाठी चिंतेचा विषय गोलन्दाजाचा खराब फॉर्म आहे. फलंदाजांना मदत करणाऱ्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर त्यांना गुजरातच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
तर गुजरात संघाचे गोलन्दाज स्टार स्पिनर राशिदखानने चांगली कामगिरी केली आहे. या संघाला वेगवान गोलन्दाज मोहम्मद शमीची उणीव जाणवत आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघाचे प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), करण शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमर, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार, विल जॅक, यश दयाल.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अजमतुल्ला उमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.