आज मंगळवार 7 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल चा संघ दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आमने सामने येणार. दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल . यापूर्वीचा सामना राजस्थान रॉयलने जिंकला होता. PL 2024 चा 56 वा सामना दिल्ली आणि राजस्थान यांच्यात मंगळवार, 7 मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.
दिल्ली कॅपिटल ने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 संघाने जिंकले आहेत. संघाला 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीला उर्वरित तीनही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. पुढील तीन सामने जिंकल्यानंतरही दिल्लीचे एकूण गुण 16 होतील तरीही दिल्लीला प्लेऑफ मध्ये पोहोचणे कठीण आहे.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाला पुनरागमन करावे लागणार आहे. दिल्ली संघाला विजय मिलव्यासाठी ऋषभ पंतला धावा कराव्या लागणार. ऋषभ ने या हंगामात दमदार पुनरागमन केले असून 3 अर्धशतकाच्या मदतीने 380 धावा केल्या आहे. ऋषभची कामगिरी पाहता त्याचा T 20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पंत शिवाय संजू सॅमसन चा समावेश देखील T20 विश्वचषकात करण्यात आला आहे.
सध्या राजस्थान रॉयल गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. सामना जिंकल्यावर राजस्थान संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याशिवाय रॉयल्सकडे संदीप शर्माच्या रूपाने आणखी एक उपयुक्त गोलंदाज आहे
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, जॅक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार.