सध्या IPL चे सामने सुरु आहे हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघर्ष करत आहे. मुंबईने आता पर्यंत 12 सामने खेळले असून चार सामने जिंकले आहे. सूर्यकुमार यादवच्या दमदार शतकाच्या खेळी मुळे मुंबईने 7 गडी राखून हैदराबादचा पराभव केला.
मुंबईचे माजी कर्णधार या सामन्यात प्लॉप झाला. तरीही वानखेडे स्टेडियम मध्ये रोहित शर्मा चे फॅन्स भरपूर होते. सामान्य दरम्यान रोहितचे चाहते रोहितच्या नावाची घोषणा करत होते.
ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाज मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन क्रिकेटशी संबंधित असून ती एक स्पोर्ट्स प्रेझेन्टर आणि अँकर असून रोहित शर्माची फॅन आहे. तिने मुंबई इंडियनच्या चाहत्यांसोबत धमाल केली. ग्रेसने मुंबईत आल्यावर स्वतः रोहित शर्मा मुंबईचा राजा म्हणत घोषणा करायला सुरु केले. निळ्या रंगातील जर्सी, चेहरा आणि अंगावर लावलेला निळा रंग, रोहित शर्माचा जयघोष होत होता.
ग्रेस हेडनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोकांनी तिला वायरल गर्ल असं नाव दिले. ग्रेस हेडन आयपीएल 2024 साठी अधिकृत प्रसारकाशी संबंधित आहे. ग्रेस हेडनने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसोबत खूप धमाल केली.