Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता इंटरनेटशिवाय मोबाइलवर टीव्ही

आता इंटरनेटशिवाय मोबाइलवर टीव्ही
रेडिओसारखे इंटरनेटशिवाय आता मोबाइलवर दूरदर्शनचे प्रसारण पाहता येणार असून यात एकूण 20 चॅनेल पाहाता येणार आहेत. यात पाच दूरदर्शनचे असतील आणि 15 खासगी चॅनेल्स पाहाता येतील. यासाठी कोणतेही शुल्क तुम्हाला द्यावे लागणार नाही. अँड्रॉईड आणि आयफोनवर या प्रसारणाचा लाभ घेता येणार आहे.20 फ्री टू एअर चॅनेल्स मोबाइलवर दाखवण्यासाठी दूरदर्शनद्वारे डीवीबीटी (डिजिटल वीडिओ ब्रॉडकास्ट टेरेस्ट्रायल) हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. सुरुवातीला ते डोंगलच्या सहाय्याने जोडता येईल. याद्वारे दूरदर्शनचे सिगAल मिळवून आपल्याला इंटरनेटशिवाय टीव्ही पाहाता येईल. यानंतर दूरदर्शनचे अँप तयार करण्यात आले आहे. ते डाऊनलोड केल्यास आपल्याला या 20 चॅनेल्सचे थेट प्रसारण मोबाइलवर एफ एम रेडिओसारखे इंटरनेटशिवाय पाहता येणार आहे. सध्या युरोपमध्ये अशाप्रकारे इंटरनेटशिवाय मोबाइलवर चॅनेल्स पाहाता येतात. सॅमसंग, अँपल, मायक्रोसॉफ्ट आणि एचसीएलसारख्या कंपन्यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये एफ एम रेडिओसारखे दूरदर्शनच्या इनबिल्ट डोंगलची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. या योजनेची ब्लूपिंट्र प्रसार भारतीने तयार केली असून मंजुरीसाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे पाठवले आहे. तसेच सध्या दिल्लीमध्ये ट्रान्समीटरच्या सहाय्याने या योजनेच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. लवकरच ही योजना प्रत्यक्षात अमलात येईल, असे एका दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi