Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता गुगलचेही नवे अँप

आता गुगलचेही नवे अँप
, शनिवार, 14 मे 2016 (09:52 IST)
सध्याच्या तरुणाईचा मेसेजिंग व चॅटिंग एक अविभाज्य भाग बनला असून हेच हेरून गुगलही आता मोबाइल मेसेजिंग अँप्लिकेशन सुरू करणार आहे. फेसबुकच्या ‘व्हॉटस्अँप’आणि मेसेंजर या अँपप्रमाणेच ‘टेनसेंट’चे ‘वी चॅट’हे अँप्लिकेशनही लोकप्रिय आहे. गुगलचीदेखील ‘हँग आउट’ही सुविधा सध्या उपलब्ध आहे. यातील सुविधांच्या तुलनेत अधिक सरस अँप तयार करण्याचा गुगलचा प्रयत्न असून प्लेस्टोअरवर गुगलचे हे नवे ‘अँप’कधी उपलब्ध केले जाणार आणि त्याचे नाव काय याबात अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. गुगलची स्पर्धा सोशल नेटवर्किगमधील आघाडीचे संकेतस्थळ असलेल्या फेसबुकशी असून, फेसबुक देत असलेल्या सुविधा अँपमध्ये देण्याचा गुगलचा प्रयत्न असल्यामुळे फेेसबुकशी थेट स्पर्धा करण्यासाठी गुगल हे ‘अँप’ तयार करीत असल्याचे स्पष्ट आहे. मेसेजिंग आणि चॅटिंग एवढय़ापुरतेच हे ‘अँप’मर्यादित राहणार नसून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आधारित ‘नो-हाऊ’,इंटिग्रेटेड चॅटबोटस् आणि ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचीही सुविधा या ‘अँप’मध्ये दिली जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा होणार जिवंत?