Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता मोबाइलवर 1 रुपयात दोन तास बोला चक्क मोफत

आता मोबाइलवर 1 रुपयात दोन तास बोला चक्क मोफत
, सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (11:27 IST)
मोबाइलवर बोलण्याचा तुम्हाला शौक आहे का, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता तुम्ही 1 रुपयांत दोन तास चक्क मोफत बोलू शकता. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. एअरसेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर सुरू केली आहे. या योजनेनुसार तुम्ही सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत मोफत कॉल करू शकता. सकाळच्या या दोन तासांसाठी तुम्हाला केवळ 1 रुपया द्यावा लागणार आहे. हे शुल्क पहिल्या कॉलसाठी असणार आहे. त्यानंतर 6 ते 8 दरम्यान केलेल्या कॉल्सवर चार्ज आकारला जाणार नाही. एअरसेलचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर अनुपम वासुदेव यांनी ही नवी स्कीम लाँच केली आहे. ही योजना विद्यार्थी आणि युवा पिढीला डोळ्यासमोर सुरू करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi