Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंटरनेट वापरताना 63 टक्के लोकांना येतात अडचणी

इंटरनेट वापरताना 63 टक्के लोकांना येतात अडचणी
, गुरूवार, 30 एप्रिल 2015 (15:41 IST)
भारतातील 60 टक्क्यांहून अधिक मोबाइल युझर्सना खराब नेटवर्कमुळे इंटरनेट वापरताना अडचणी येत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. एरिक्शसन या कंपनीने या संबंधित 33 मोठय़ा शहरांचा अभ्यास केला त्यातून ही माहिती समोर आली आहे.
 
देशातील सुमारे 63 टक्के लोकांना घरात इंटरनेट वापरताना योग्य नेटवर्क नसल्याने आवाज तुटणे, सतत कनेक्शन बंद होणे, अनियमित वेग, थ्रीजी उपलब्धता नाही. या विविध अडचणींना तोंड द्यावे लागते, असे एरिक्शसनने आपल्या अहवालात म्हटले आहे.
 
सप्टेंबर 2014 ते जानेवारी 2015 या कालावधीदरम्यान शहरी भागातील 15 हजार घरांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 15 ते 75 या वयोगटातील स्मार्टफोन वापरणार्‍यांची संख्या 12 कोटी सात लाख इतकी आहे.
 
या अभ्यासानुसार तीनपैकी एक व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करत आहे. तर पाचपैकी तीन स्मार्टफोन युझर्स मोबाइल ब्राँडबँडचा वापर करतात. एरिक्शसच्या अहवालानुसार, सोशल नेटवर्किग साईटच्या वापरासाठी 61 टक्के इंटरनेटचा वापर होतो. तर 54 टक्के वापर म्युझिक तसेच व्हिडिओ डाऊनलोडिंगसाठी तसेच इन्स्टंट मेसेजिंग अँपसाठी वापर होतो. 46 टक्के वापर इंटरनेट ब्राऊसिंगसाठी तर 45 टक्के वापर इमेलसाठी केला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi