Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअरटेल भारतात सर्वप्रथम आणणार फाइव्ह जी

एअरटेल भारतात सर्वप्रथम आणणार फाइव्ह जी
, बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (11:59 IST)
थ्रीजी,फोरजी सेवा भारतात उपलब्ध करून देण्यात रिलायन्स जिओ व एअरटेलने आघाडी घेतली असतानाच भविष्यात फाइव्ह जी सेवा भारतात प्रथम उपलब्ध करून देण्यासाठी एअरटेलने योजना आखली असल्याचे समजते. एअरटेलचे अध्यक्ष सुनीलकुमार मित्तल या संदर्भात माहिती देताना म्हणाले, आम्ही फाइव्ह जी साठी फ्रेमवर्क सुरू केले आहे आणि त्यासाठी जगातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी चायना मोबाइलबरोबर करारही केला आहे. या दोन कंपन्या मिळून फाइव्ह जी साठी इक्विपमेंट विकसित करणार आहेत.
 
भारतात फाइव्ह जी सेवा सुरू होण्यासाठी आणखी किमान सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागेल असेही सांगितले जात आहे. सरे विद्यापीठातील संशोधकांनी फाइव्ह जी तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेतल्या आहेत आणि त्या यशस्वी झाल्या आहेत. या सेवेमुळे इंटरनेट अधिक वेगवान बनणार असून त्याचा वेग सध्याच्या फोर जी पेक्षा किमान 65हजार पट अधिक असेल म्हणजे 1 सेकंदात या सेवेमुळे 30 चित्रपट डाऊनलोड करता येतील असे समजते. मोबाइल फिफ्थ जनरेशन असे या नेटवर्कला म्हटले जाते. त्याच्या संशोधनाची सुरवात 2010 मध्येच झाली होती आणि मुख्यत: मोबाइल इंटरनेट लक्षात घेऊनच ते विकसित केले गेले आहे. साधारण 2020 सालात ते वापरात येईल आणि त्याचा मुख्य उपयोग प्रचंड प्रमाणावर डेटा ट्रान्स्फरसाठी होऊ शकेल असे सांगितले जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi