Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगल क्रोमकास्ट भारतात उपलब्ध

गुगल क्रोमकास्ट भारतात उपलब्ध
, मंगळवार, 16 डिसेंबर 2014 (11:24 IST)
गुगलने त्यांचे क्रोमकास्ट उपकरण भारतात उपलब्ध करून दिले असून त्याची किंमत आहे 2999 रूपये. यासाठी गुगलने स्नॅपडीलशी करार केला असून ते स्नॅपडीलमार्फत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या डिव्हाईसच्या लॉचिंगसाठी गुगलने एअरटेलबरोबर करार केला आहे. त्यानुसार एअरटेल 60 जीबी ब्रॉडबँड डेटा (3 महिन्यांसाठी म्हणजे प्रत्येक महिन्याला 20 जीबी) नवीन क्रोमकास्ट युजरला देणार आहे.
हे डिव्हाईस वापरण्यासाठी इंटरनेटचा स्पीड समाधानकारक असायला हवा असे सांगितले जात आहे. या उपकरणाच्या मदतीने नेटफ्किक्स, यूटय़ूब, व बाकी इंटरनेट रिलेटेड सेवा टीव्हीवरही यूजर वापरू शकणार आहे. हे उपकरण स्मार्ट टीव्हीला जोडता येते तसेच स्मार्टफोन, लॅपटॉपलाही कनेक्ट करता येते. स्मार्टफोनचे कंटेंट टीव्हीपर्यंत नेणेही या उपकरणामुळे शक्य असले तरी कॉपीराईटमुळे लोकल कंटेंट मात्र टीव्हीवर दिसू शकणार नाहीत, असेही समजते.
 
इरोज कंपनीनेही ही सेवा देऊ केली असून ही कंपनी क्रोमकास्टच्या नवीन यूजरला दोन महिने ही सेवा मोफत देणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi