Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगल लाँच करणार 180 सॅटेलाईट

गुगल लाँच करणार 180 सॅटेलाईट
, शुक्रवार, 6 जून 2014 (17:49 IST)
गुगल इंटरनेट सेवेसाठी 180 सॅटेलाईट लाँच करत आहे. जगभरात आजही सुमारे 5 अब्ज लोक इंटरनेटपासून दूर आहेत. त्यांना जगभराशी जोडण्यासाठी या सॅटेलाईटची मदत होऊ शकणार आहे, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ग्रेग वायलर यांनी हे सॅटेलाईट विकसित केले आहेत. वायलर हे सॅटेलाईट कम्युनिकेशन ओ थ्री बी नेटवर्कचे संस्थापक आहेत. हे सॅटेलाईट आकाराने छोटे पण अधिक क्षमतेचे आहेत.

पृथ्वीच्या कक्षेत सध्या जे सॅटेलाईट आहेत त्यापेक्षा कमी उंचीवर हे सॅटेलाईट लाँच केले जाणार आहेत. यासाठी गुगलला 1 अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे मात्र जगाच्या दुर्गम भागातही यामुळे इंटरनेट सेवा पुरविता येणार आहे. या प्रकल्पासाठी गुगलने हाय अल्टीट्यूड बलून्स डिझाईन करण्याचे काम सुरू केले आहे तसेच इंटरनेट सेवा पुरविता यावी यासाठी त्यांनी टायटन एरोस्पेस घेऊन तेथे सोलर पॉवरवर चालणारी ड्रोनही वापरात आणली जाणार आहेत

Share this Story:

Follow Webdunia marathi