Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चहाच्या टपर्‍यांवर फुकटात इंटरनेट

चहाच्या टपर्‍यांवर फुकटात इंटरनेट
, मंगळवार, 20 जानेवारी 2015 (17:44 IST)
येत्या काही दिवसातच मुंबईसह देशभरात चहाच्या गाडय़ांवर चहासोबतच फुकटात वाय-फायही मिळणार आहे. ‘मुफ्त इंटरनेट’ ही संस्था 2016 पर्यंत देशभरातील चहाच्या टपर्‍यांवर सर्वच सार्वजनिक ठिकाणी ही सुविधा सुरू करणार आहे.
 
साधारणत: 500 रुपयात 50 जण 30 दिवसांसाठी एकदा इंटरनेट अँक्सेस करू शकतात. म्हणजेच इंटरनेट अँक्सेससाठी प्रत्येकी 10 रुपये मोजावे लागतात. पण ‘मुफ्त इंटरनेट’ने हे पैशाचं जाळं भेदून, सार्वजनिक ठिकाणी फुकटात इंटरनेट अँक्सेस पुरवण्याचा चंग बांधला आहे. चहाच्या टपर्‍या, कॅङ्खेज, शाळा, रुग्णालये, रेल्वे स्टेशन्स यासारख्या सर्व सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट फुकटात वापरता येईल.
 
ना नोंदणी शुल्क, ना डेटा फी, MUFT Wifi Hotspots हे फुकटात नेहमी इंटरनेट सेवा देईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त मुफ्त वाय-फाय अकाउंट (MUFT Wifi account) क्रिएट करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही कुठेही, कधीही फुकटात इंटरनेट वापरू शकाल असं ‘मुफ्त इंटरनेट’चे सहसंस्थापक विपुल पटेल यांनी सांगितलं.‘मुफ्त इंटरनेट’ सध्या ही सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी जोमाने कामाला लागली आहे. सध्या 85 टAके भारत ऑफलाइन आहे. अनेक लोक याबाबत अद्याप जागृत नाहीत. मात्र फ्री इंटरनेटमुळे जनतेला त्यांचा हक्क   मिळेल आणि ते जगासोबत येतील, असं पटेल यांचं म्हणणं आहे. ‘मुफ्त इंटरनेट’ हे सरकारी अँथोरिटी, उद्योग तज्ज्ञ आणि सिलिकॉन वॅली गुंतवणूकदारांसोबत मिळून ही सुविधा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम करत आहे.
 
काही कॅफे, रेस्टॉरंट मोफत वाय- फाय पुरवत असल्यामुळे, त्यांचा बिझनेस वाढला आहे. मात्र आता ‘मुफ्त इंटरनेट’च्या माध्यमातून चहाच्या टपर्‍यांवरही मोफत इंटरनेट पुरवलं, तर लोक तिकडेही धाव घेतील. त्यामुळे त्यांचाही बिझनेस वाढू शकेल, असं नेहा रांभिया या माजी आयआयटीयन्सने म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi