Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनने सुरु केली ५ जी टेस्ट

चीनने सुरु केली ५ जी टेस्ट
, शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016 (10:40 IST)
आपला प्रतिस्पर्धी असलेल्या चीनने आपल्या १00 शहरांत ५जी दूरसंचार सेवेच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. पुढील पिढीतील दूरसंचार सेवेत अग्रेसर राहण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले आहे.हाँगकाँगमधील या दैनिकाने या संबंधीचे वृत्त दिले आहे.
 
४जीच्या तुलनेत ५जी दूरसंचार नेटवर्क २0 पट अधिक गतिमान आहे, तसेच त्यात डाटा लॉस होण्याचे प्रमाणही फारच कमी आहे . चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वांत मोठी ४जी बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये २0१५ च्या अखेरीस सध्या १.३ अब्ज वापरकर्ते असणार आहे.. यापैकी ३0 टक्के ग्राहक ४जी नेटवर्क वापरतात. ५जी नेटवर्कद्वारे २0 गिगाबाइट्स प्रति सेकंड इतकी गतिमान सेवा दिली जाऊ शकते. ४जीची गती १ गिगाबाइट प्रति सेकंद इतकीच आहे. यावरून ५जीच्या गतीची कल्पना यावी.त्यामुळे जगाला पुन्हा धक्का देण्यास वरचढ ठरला आहे. सध्या तरी असे चित्र आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकमधील जनता रस्त्यावर