Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्विटरवर आता ताज्या बातम्या

ट्विटरवर आता ताज्या बातम्या
, शुक्रवार, 7 ऑगस्ट 2015 (11:27 IST)
ट्विटरने सुरू केलेल्या नव्या सुविधेद्वारे युजरना ट्रेण्डमध्ये असलेल्या बातम्यांचे अपडेट मिळणार आहेत. ट्रेण्डिंग हेडलाइन्सची यादी अँप्सवर नेव्हिगेशन बारच्या वर प्रसिद्ध केली जाणार आहे. यातून युजरना बातम्यांचे कंटेंट शोधणे सोपे होणार आहे. युजरना बेस्ट कंटेंट देण्यासाठी आम्ही आयओएस आणि अँण्ड्रॉइडवर न्यूज एक्सपिरिअन्सच्या माध्यमातून नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे ट्विटरच्या प्रवक्तयांनी म्हटले आहे.

मात्र, हे प्रायोगिक तत्त्वावरील फीचर असल्यामुळे सर्व युजरना मिळणार नाही. ज्यांना ते उपलब्ध होईल, त्यांना टिटर अँपवरील आयकॉन्सच्या तळाच्या रांगेत मध्यभागी न्यूजचा आयकॉन पाहायला मिळेल.

त्यावर टॅप केल्यानंतर युजर्सच्या वाचायच्या राहून गेलेल्या बातम्या, त्याच्या इमेजेस आणि त्याबरोबरच्या टिटस्ही दिसू शकतील. हे फीचर कधीपर्यंत उपलब्ध होईल, याविषयी निश्चित कालावधी देण्यात आलेला नाही.

सध्या या फीचरबरोबर कुठल्याही जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत. सध्या हा प्रयोग फक्त जपानमध्ये करण्यात येत असून, त्यासाठी प्री अँप्रूव्हड् पब्लिशर्सची यादी बनविणे सुरू झाले आहे. टिटरने नुकतेच मराठी, गुजराती, कन्नड आणि तमिळ या चार नवीन भाषांचा समावेश केला आहे. या अपडेटसह  ट्विटर आता हिंदी आणि बंगालीसह सहा भारतीय भाषांना सपोर्ट करणार आहे. त्यामुळे भविष्यात या भाषांमधील बातम्यांही ट्विटरवर वाचायला मिळतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi