Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तरुणाने OLX वर चक्क ट्रेनच विकायला काढली

तरुणाने OLX वर चक्क ट्रेनच विकायला काढली
, शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (12:33 IST)
एखादी वस्तू विकायची किंवा खरेदी करायची असल्यास अनेक जण OLX या वेबसाईटचा वापर करतात. OLX च्या माध्यमातून सेलर्स विविध वस्तूंची विक्री करतात. टीव्ही, मोबाइल, फर्निचर, बाईक, कार या वस्तू तर विक्रीसाठी सहज उपलब्ध असतात. पण चेन्नईमधल्या एका तरुणाने चक्क ट्रेनच OLX वर विकायला काढली आहे. या तरुणाने ट्रेनचा फोटोही अपलोड केला आहे. ’train for sale at best price’ अशी जाहिरात त्याने OLX वर दिली आहे. 
 
महत्त्वाचं म्हणजे या तरुणाने ही ट्रेन केवळ दोन लाखांमध्ये विकण्याचा निर्णय घेतला आहे. अंबत्तूरमधील सुस्थित असणारी ट्रेन अगदी कमी दरात विकायची आहे. मी परदेशी जात असल्याने माझं लकी वाहन विकत आहे. मी याच वाहनाने दररोज कॉलेजला जातो. या ट्रेनचा वेगही प्रचंड आहे. अवघ्या 15 मिनिटांत ट्रेन 20 किमी अंतर पार करते. अधिक माहितीसाठी विजय कृष्णन यांच्याशी संपर्क साधा, अशी जाहिरात OLX वर आहे. त्यामुळे ट्रेन विकत घेण्यात कोणी इंटरेस्टेड असेल तर OLX  या वेबसाईटवर व्हिजीट करा आणि ही ट्रेन विकत घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi