Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमचं पर्सनल व्हॉट्सअँप चॅट आणखी सुरक्षित

तुमचं पर्सनल व्हॉट्सअँप चॅट आणखी सुरक्षित
तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी व्हॉट्सअँप आणखी पावलं उचलत आहे. यापुढे तुमच्या व्हॉट्सअँपचा डेटा कोणीही हॅक करू शकणार नाही. कारण आपल्या ग्राहकांची प्रायव्हसी जपण्यासाठी व्हॉट्सअँपने ‘ऍड-टू-ऍड’ एनक्रिप्शन’ ही सुविधा सुरू केली आहे. ज्यामुळे दोन व्यक्तींमध्ये व्हॉट्सअँपवर पाठवले जाणारे मेसेज, व्हॉईस कॉल आता हॅक करता येणार नाहीत.
 
अमेरिकेत मोबाइल कंपनी अँपल आणि पोलीस तपास यंत्रणा एफबीआय यांच्यातल्या कायदेशीर लढाईनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या आधी व्हॉट्सअँपवर दोन व्यक्तींमध्ये पाठवले जाणारे मेसेज सहज हॅक करता येऊ शकत होते. पण अमेरिकेत अतिरेक्यांचा आयफोन चेक करण्यासाठी एफबीआयच्या अधिकार्‍यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय फोन हॅक केला होता. 
 
त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतलाय. तुमचा डेटा आणि चॅट/संवाद सुरक्षित ठेवण्याला आमचं प्राधान्य आहे. हे आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केलं आहे. तुमचा खासगी संवाद ‘ऍड-टू-ऍड’ एनक्रिप्शन’द्वारे आणखी सुरक्षित होईल, असं व्हॉट्सअँपचे संस्थापक जॅन कौम यांनी म्हटलं आहे. तुमचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. हॅकर्सनाही ते शक्य होणार नाही. 
 
इतकंच काय तर आम्हालाही ते पाहता येणार नाही. ‘ऍड-टू-ऍड एनक्रिप्शन’मुळे व्हॉट्सअँप चॅट आणखी सुरक्षित होईल. अगदी समोरासमोर किंवा ‘फेस टू फेस’ संवाद साधल्याप्रमाणेच ते गोपनीय असेल असा दावा व्हॉट्सअँपने केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi