Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमच्यासाठी खास मेसेंजर अॅप!

तुमच्यासाठी खास मेसेंजर अॅप!
, शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (12:09 IST)
म्युझिक स्ट्रिंग सर्व्हिस लॉन्च केल्यानंतर ‘लाइन’ने लाईट व्हर्जनचं मेसेंजर अँप लॉन्च केलं आहे. लाइन लाईट असं या अँपचं नाव आहे. हे अँप लवकरच गुगल स्टोअरवर उपलब्ध करुन दिलं जाणार आहे.

लाइन कॉर्पोरेशन आशियामध्ये खूप लोकप्रिय आहे. लाइन ही कंपनी टी-शटर्स ते कॅफेपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर मानली जाते. काही महिन्यांपूर्वी फेसबुकने लाईट व्हर्जन लॉन्च केले होते. फेसबुकच्या लाईट व्हर्जनची काही दिवसांपूर्वी खूप चर्चाही झाली होती.

स्लो नेट असणार्‍या युजर्सना डोळ्यासमोर ठेवून हे अँप तयार केलं गेलं आहे. हे अँप जवळपास 912 केबी एवढय़ा साईजचं असणार आहे. या मेसेंजर अँपमध्ये टेक्स्ट, स्टिकर इत्यादी पर्यायही उपलब्ध असणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi