Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेसबुकवरील माहिती पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित

फेसबुकवरील माहिती पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित
, शुक्रवार, 8 मे 2015 (12:52 IST)
फेसबुकने आपल्या यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेता एक नवं फीचर लॉन्च केलं आहे. या फीचरनुसार फेसबुकने एक नवं लॉग इन टूल सुरू केलं आहे. या अपडेटेड टूलच्या माध्यमातून थर्ड पार्टी अप्लिकेशन आणि वेबसाइटवर फेसबुक क्रेडिन्शियलवर साईन इन करून कोणती माहिती शेअर करायला हवी, याचा पर्याय निवडण्याचा अधिकार आता फेसबुक यूजर्सना मिळणार आहे. 
 
फेसबुकने या नव्या फीचरची माहिती एका ब्लॉग पोस्टाद्वारे दिली आहे. आता तुम्ही जर कोणत्या थर्ड पार्टी अप्लिकेशन किंवा वेबसाइटवरून लॉग इन करताना यूजर्सला आपली माहिती द्यावी लागत होती, ती आता द्यावी लागणार नाही. या नव्या फीचरनंतर फेसबुक यूजर्स इतर यूजर्सनी कोणती माहिती पाहावी, याचीही सेटिंग करू शकणार आहे. 
 
या फीचरच वापर करण्यासाठी तुम्ही जेव्हा कोणत्याही थर्ड पार्टी अप्लिकेशनवरुन लॉग इन केल्यानंतर ‘लॉग इन विथ फेसबुक’वर टॅप केल्यानंतर फेसबुकचा ‘Edit the info you provide’ चा पर्याय मिळेल. इथे इतर कोणाला माहिती दाखवायची नसेल, तर तुम्हाला इथे सेटिंग करता येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi