Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेसबुकवरून हटवणे का जरूरी आहे आपली जन्म तारीख!

फेसबुकवरून हटवणे का जरूरी आहे आपली जन्म तारीख!
तुमचा वाढदिवस आणि जीवनाच्या काही खास क्षणांची आठवण करून देण्याचे काम फेसबुक फारच चांगल्या प्रकारे करतो. इथपर्यंत तर ठीक आहे पण जर तुमची जन्मतारीख आणि इतर माहितीपण तुम्ही फेसबुकवर टाकली आहे, तर हे तुम्हाला नक्कीच अडचणीत टाकतील. 
 
जर तुम्हीपण फेसबुकवर वाढदिवसापासून कुटुंबियांची आणि आपली वैयक्तिक माहिती टाकली आहे तर जेवढं शक्य असेल तेवढ्या लवकर काढून घ्या. भले फेसबुक तुम्हाला अपडेट ठेवण्यात मदत करतो पण तुमच्याबद्दल येथे मेंशन केलेल्या जन्मतिथीपासून फोन नंबर, मेल आयडी आणि इतर माहिती न फक्त सायबर क्राईमच्या शंकेला वाढवत बलकी तुम्हाला सायबर क्राईमचा शिकार देखील करतो. 
 
मागील काही वर्षांमध्ये असे बघायला मिळाले आहे की फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर देण्यात आलेली वैयक्तिक माहिती व सूचना, सायबर क्राईमला दुजोरा देण्यास मदतगार साबील झाले आह आणि मागील 1 वर्षात या अपराधांमध्ये 57 टक्के वाढ झाली आहे. ह्या सूचना, सायबर चोरांसाठी एखादे जॅकपॉट जिंकण्यापेक्षा कमी नाही आहे.  

सायबर क्राईम प्रोफेशनल्स देखील वैयक्तिक माहिती आणि फोटो फेसबुक किवा सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपडेट न करण्याचा सल्ला देतात, ज्यात तुमचा फोन नंबर, कार्यस्थळ, ईमेलआयडी व पारिवारिक माहिती सामील असेल. तुम्ही जेवढी माहिती या साईट्सवर टाकाल, तुमचे सायबर शिकार होण्याची शक्यता तेवढीच जास्त होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोण वापरतंय वायफाय?