Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातील इंटरनेट वाढीचा वेग मंदावलेला

भारतातील इंटरनेट वाढीचा वेग मंदावलेला
, शनिवार, 7 जून 2014 (11:48 IST)
माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट अत्यंत म हत्त्वाचे माध्यम आहे. एकमेकांशी जोडण्याबरोबरच मा माहितीचा खजिना इंटरनेटवरून मिळतो. आपली अनेक कामे चुटकीसरशी होतात. मात्र भारतात इंटरनेटवाढीचा वेग हा आशिया-प्रशांत क्षेत्रातील अन्य देशांपेक्षा कमी आहे. 2014 मध्ये देशातील इंटरनेट वाढीचा वेग केवळ 17.4 टक्के राहिला आहे.

भारतापेक्षा चीन व इंडोनेशिात इंटरनेट वाढीचा वेग अधिक आहे. यंदा आशिया-प्रशांत क्षेत्रात 133 कोटी जणांकडे इंटरनेटचे कनेक्शन असेल. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील इंटरनेटवाढीचे प्रमाण कमी आहे. दक्षिण कोरिया इंटरनेटमध्ये आघाडीवर आहे. त्यांच्याकडे 78.9 टक्के लोकांकडे इंटरनेट आहे. त्यानंतर जपान (77.3 टक्के), ऑस्ट्रेलिया (76 टक्के), चीन (48.5 टक्के) आणि इंडोनेशिया (33 टक्के) कडे इंटरनेट आहे. या देशांमध्ये इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला असून तेथील मागणी आता घटू लागली आहे, असे इमर्करने आपल्या संशोधन अहवालात म्हटले आहे.

2012 ते 2018 दरम्यान भारतातील इंटरनेटचे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. तसेच 2016 पर्यंत इंडोनेशिात इंटरनेटचे प्रमाणात 10 टक्के वाढण्याची शक्यता आहे.

इंटरनेट व मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने या महिन्यात देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 243 दशलक्षावर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरवर्षी इंटरनेट वाढीचे प्रमाण 28 टक्क्याने वाढले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi