Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय तरुण या गोष्टीसाठी वापरतात सर्वाधिक इंटरनेट!

भारतीय तरुण या गोष्टीसाठी वापरतात सर्वाधिक इंटरनेट!
, सोमवार, 18 एप्रिल 2016 (10:51 IST)
भारतातील नेटीझन्स इंटरनेटचा सर्वाधिक वापर कशासाठी करतात याबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, जयपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद यासारख्या सहा बडय़ा शहरांतील तरुणांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमधून सर्वाना चकित करणारा निष्कर्ष समोर आला आहे. 98% तरुणांचं म्हणणं आहे की, ते इंटरनेटचा सर्वाधिक वापर हा ऑनलाइन शॉपिंगसाठी करतात. तर 96% सोशल नेटवर्किगसाठी करतात. 18 ते 30 वयातील तरुणांना ऑनलाइन बिल भरणं पसंत आहे. 
 
दिल्ली आणि बंगळुरुमधील 81% तरुण ऑनलाइन बिल भरतात. तर मुंबईत 69% तरुण आपलं बिल ऑनलाइन भरतात.
 
ऑनलाइन शॉपिंगसाठी इंटरनेटचा सर्वाधिक वापर होतो कारण की, बर्‍याच ब्रँण्डेड वस्तूंवर बरचंस डिस्काउंट मिळतं. तसंच कॅशबॅक ऑफर, डिस्काऊंट कूपन यादेखील गोष्टी असतात. सर्व्हेनुसार, एक भारतीय तरुण यापुढे वर्षभरात जवळजवळ 60% खर्च ऑनलाइन शॉपिंगवरच करेल असा अंदाज आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi