Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत अमेरिकेला इंटरनेटमध्ये मागे टाकणार

भारत अमेरिकेला इंटरनेटमध्ये मागे टाकणार
इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत जगातील बलाढय़ समजल्या जाणार्‍या अमेरिकेला लवकरच मागे टाकणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून भारत इंटरनेट वापरामध्ये अमेरिकेलाही मागे टाकून जगातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी ऑनलाइन बाजारपेठ ठरणार आहे. भारतातील इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या आता या वर्षअखेरीपर्यंत 30 कोटी 20 लाखांवर पोचण्याची शक्यता आहे. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि आयएमआरबी इंटरनॅशनल यांच्या एका अहवालानुसार भारतातील इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या 32 टक्क्यांनी वाढून ती 21 कोटी 30 लाखांवरून डिसेंबरअखेर 30 कोटींच्या वर जाईल. 
 
चीनमध्ये इंटरनेट वापरकत्र्यांची संख्या 60 कोटी एवढी आहे, तर अमेरिकेत 27 कोटी 90 लाख लोक इंटरनेट वापरतात. भारतातील एकूण इंटरनेट वापरकत्र्यांची संख्या जून 2015 पर्यंत 35 कोटी 40 लाख एवढी होईल असे अहवालात नमूद आहे. भारतातील इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या एक कोटीवरून दहा कोटीपर्यंत जाण्यासाठी दहा वर्षे लागली. 
 
परंतु, दहा कोटींवरून वीस कोटींपर्यंतची संख्या केवळ तीन वर्षात गाठली. त्याचप्रमाणे 20 कोटींवरून 30 कोटीपर्यंत संख्या जाण्यासाठी केवळ एक वर्ष लागले. इंटरनेट हा भारतातील मुख्य प्रवाह बनला आहे हे यावरून स्पष्ट होते, असे या अहवालात सांगण्यात आलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi