Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार्क झुकेरबर्गवर फसवणुकीचा खटला

मार्क झुकेरबर्गवर फसवणुकीचा खटला
, गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (11:02 IST)
एका मालमत्ता विकासकाने फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्यावर चक्क फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. कॅलिफोर्निया येथील न्यायालयानेदेखील सुनावणीदरम्यान या प्रकरणात फसवणूक झाल्याचे प्राथमिकदृष्टय़ा निदर्शनास आल्याने याचिका दाखल करुन घेतली आहे. तसेच झुकेरबर्गला याप्रकरणी दोषी ठरवले असून या खटल्याची सुनावणी पुढील आठवडय़ात होणार आहे. 
 
कॅलिफोर्नियाच्या पालो अल्टोमध्ये मिर्सिया वोस्केरिसियन यांच्याशी त्यांच्या घराशेजारील एक जागा आणि घर खरेदी करण्याचा झुकेरबर्ग याने 2012 मध्ये करार केला होता. या करारात झुकेरबर्ग यांना 40 टक्के सूट दिलचा दावा मिर्सिया यांनी केला आहे. त्याबदल्यात सिलिकॉन वॅलीमध्ये आपल्या ओळखीने व्यवसाय वाढवण्यास मदत करू, असे झुकेरबर्ग याने सांगितले होते. परंतु असे झाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप मिर्सिया यांनी केला आहे. 
 
हा करार 11 कोटी रुपयांना करण्यात आला होता. झुकेरबर्ग प्राथमिक सुनावणीत दोषी आढळल्यामुळे खटला रद्द करण्याची झुकेरबर्ग याची मागणी कॅलिफोर्नियाच्या न्यायमूर्ती पॅट्रिसिया लुकास यांनी फेटाळून लावली. तोंडी आश्वासने स्पष्ट व बाध्य नाहीत, असा दावा झुकेरबर्गच्या वकील पॅट्रिक गन यांनी केला. मात्र मिर्सिया आणि झुकेरबर्ग या दोघांनी एकमेकांना पाठवलेले ई-मेल मर्सियांच्या वकिलांनी दाखवले. त्यातून तोंडी आश्वासनाला पुष्टी मिळत असल्याने झुकेरबर्ग अडचणीत सापडला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi