Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार्क झुकेरबर्ग जातोय सुटीवर

मार्क झुकेरबर्ग जातोय सुटीवर
, शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (09:44 IST)
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग दोन महिन्यांच्या सुटीवर जात आहे. मार्कच्या घरी लवकरच छोटय़ा पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर तो दोन महिन्यांसाठी पॅटर्निटी लिव्हवर जाणार आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबीयांसाठी वेळ देता यावा यासाठी मार्कने सुटी घेण्याचा निर्णय घेतलाय. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. प्रिसिला आणि मी बाळाच्या आगमनाची तयारी सुरु केली आहे असे मार्कने फेसबुक पोस्टवर लिहिले आहे. 
 
फेसबुकमधील कर्मचार्‍यांना चार महिन्यांची पॅटर्निटी रजा मिळते. दरम्यान, मार्कच्या अनुपस्थितीत सोशल नेटवर्किग साईटचे कामकाज कोण सांभाळणार याबाबत मार्कने कोणतीही माहिती दिलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi