Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्टर-ब्लास्टर जेव्हा बनतो मास्टरशेफ!

मास्टर-ब्लास्टर जेव्हा बनतो मास्टरशेफ!
, शनिवार, 3 जानेवारी 2015 (12:41 IST)
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर फावल्या वेळात काय करत असेल? असा प्रश्न त्याच्या कोटय़वधी चाहत्यांना पडतो.. तर, या प्रश्नाचं उत्तर खुद्द सचिननंच दिलंय तेही सोशल वेबसाईटवर.. 
 
तसा, सचिन सोशल साईटस्द्वारे कधी-कधी तो काय करत असतो याची माहिती त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. सचिननं नुकताच आपला एक फोटो सोशल वेबसाईट फेसबुकवर अपलोड केलाय. यामध्ये, तो चक्क जेवण बनवताना दिसतोय. 
 
सुटीसाठी सध्या मसूरीत असलेल्या सचिनने आपल्या तब्बल 45 मित्रांसाठी वांग्याचं भरीत बनवलंय आणि हा क्षण त्यानं कॅमेर्‍यात कैदही केलाय. आईने ही रेसेपी आपल्याला शिकवलं असल्याचंही त्यानं फोटोच्या बाजूला नमूद केलंय. या फोटोला आतापर्यंत एक लाख 32 हजार लाईक्स मिळाल्या असून 16 हजारांहून अधिक जणांनी हा फोटो शेअर केलाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi