Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृत्युची तारीख सांगणारा एप

मृत्युची तारीख सांगणारा एप
, मंगळवार, 21 एप्रिल 2015 (16:18 IST)
असे म्हटले जाते की जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी देवाने आपल्या हातात ठेवल्या आहे पण अता एक असे एप आहे जे आपण कधी मरणार आहोत हे सांगेल. डेडलाइन नावाचा हा एप आपल्या मृत्यूबद्दल असेच उत्तर न देता आयफोनच्या हेल्थकीट टूलद्वारे माहिती मिळवून आपल्या मरण्याची तारीख ठरवतो.

हे टूल आपली उंची, ब्लड प्रेशर, दिवसभर पायी चालण्याचा आणि झोपण्याचा रिकॉर्ड ठेवतो. एप ह्या डेटाचा वापर करून आपल्या लाइफ स्टाइलबद्दल जाणून घेतो आणि त्याआधारावर मृत्युची तारीख सांगतो.

ह्या एपच्या डेव्हलपरप्रमाणे प्रत्यक्षात कोणताच एप हे सांगण्यात असमर्थ ठरेल की आपणं कधी मराल. हे जाणून घेण्यापेक्षा हे एप आपल्या आरोग्याचे लक्ष ठेवून आपल्याला उत्तम जीवनशैली जगणे आणि आवश्यक

असल्यास डॉक्टरकडे जाण्याकरिता प्रोत्साहित करतो. पौष्टिक जेवण आणि नियमित व्यायामाने आपण ह्याचा भविष्यवाणीला खोटं ठरवू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi