Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॅसेज, जाहिरातीवर विश्वास ठेवताना सावधान!

मॅसेज, जाहिरातीवर विश्वास ठेवताना सावधान!
, सोमवार, 13 जुलै 2015 (12:13 IST)
कुणी अडचणीत असलं तर मदतीचे अनेक हात पुढे येतात. पण मदतीच्या नावाखाली तुमची ङ्खसवणूक झाल्याचं समजलं तर.. असं झालंय, औरंगाबादमध्ये.
 
तुम्ही अनाथ आहात, तुम्हाला ब्रेनटय़ुमर झालाय. तुमच्यासाठी कुणीतरी लोकांकडून 3 लाख रुपये जमा केलेत..आणि हे सगळं तुम्हाला पेपरमधल्या बातमीवरून समजलंय. असं घडलं तर? पण औरंगाबादच्या श्याम नांदरेला मात्र अगदी असाच अनुभव आलाय. घडलं असं की श्यामला उच्च रक्तदाब होता आणि त्यामुळे त्याच्या मेंदूत रक्तस्नव झाला. त्यामुळे त्याला मुंबईत उपचारासाठी आणलं. इथं त्याला एक भामटा भेटला. त्याच्या घरी श्याम राहिला. उपचार घेतले आणि परतही गेला. 
 
मात्र काही दिवसांनी एका स्थानिक वृत्तपत्रात श्यामला काही तरुणांनी आपल्या नावावर 3 लाख रुपये जमवल्याचं समजलं आणि त्याला धक्काच बसला. हे समजल्यावर श्यामनं पोलिसांत धाव घेतली आणि संबंधित वृत्तपत्रालाही खरी माहिती पुरवली. पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. हल्ली फेसबुक आणि व्हॉट्सअँपसारख्या सोशल नेटवर्किग साईट्सवर अशा मदतीचे मेसेज सर्रास फॉरवर्ड होत असतात. यातले अनेक जण खरंच गरजू असतात. पण अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार घडत असतील तर अशा गरजूंना मदत करतानाही लोक हात आखडता घेऊ लागतील. त्यामुळेच या भामटय़ांना वेळीच चाप लावायला हवा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi