Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोफत वायफाय सुविधा देणार गुगल

मोफत वायफाय सुविधा देणार गुगल
, बुधवार, 1 जुलै 2015 (11:23 IST)
जगभर मोफत वायफाय सुविधा गुगल येत्या काळात उपलब्ध करून देण्याची तयारी करीत असून एवढेच नव्हे, तर न्यूयॉर्क शहरात ट्रायलही सुरू केल्यामुळे येणार्‍या काळात प्रत्येक देशात गुगलची वायफाय सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अँड्रॉइड मोबाइलधारकांना मोफत वायफाय सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. 
 
जगभरात सध्या मोबाइलची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचप्रमाणात भविष्यात इंटरनेट सुविधेची गरज भासणार आहे. भविष्यातील ही गरज लक्षात घेऊन गुगलने योजना तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्या दृष्टीने जगभर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही एक मोठी योजना असून, यासाठी बराच कालावधी लागणार आहे. परंतु गुगलने हे काम हाती घेतल्याने लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल, यासाठी योजना आखण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर न्यूयॉर्कमध्ये ट्रायलही सुरू केली आहे. 
 
गुगल कंपनी या कामी गंभीर असून, त्यासाठी गुगलने साईडवॉक लॅब्स नावाची कंपनी सुरू केली असून, ही कंपनी न्यूयॉर्कमधील दोन सर्वात वेगवान इंटरनेट सेवा देणार्‍या कंपन्या खरेदीची योजनाही आखत आहे. विशेष म्हणजे न्यूयॉर्कमध्ये वायफाय सुविधा देण्यासाठी बिग अँपल्सच्या जुन्या फोन बूथचा वापर करण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi