Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोबाईल इंटरनेट म्‍हणजे काय..?

मोबाईल इंटरनेट म्‍हणजे काय..?
PRPR
आपण अधिकाधिक आधुनिक मोबाईलचा वापर करू लागलो. मात्र अनेकदा आपल्‍याला त्‍यातील सर्वच फंक्‍शन्‍स कळतातच असेही नाही.

मोबाईल व इंटरनेट सारख्‍या संपर्काच्‍या माध्‍यमांमध्‍ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणवर होणा-या बदलांना ध्‍यानात घेता ते समजून घेण्‍ो आजच्‍या काळात आवश्‍यक झाले आहेत. आमच्‍याकडे असलेल्‍या काही एप्लीकेशन्‍सच्‍या माध्‍यमातून ही माहिती आम्‍ही आपणासाठी देत आहोत.

वीओआयपी तथा चॅट चिप्स
वीओआयपी (वॉईस ओव्‍हर इंटरनेट प्रोटोकॉल) हे असे तंत्र् आहे की ज्‍याच्‍या मदतीने मोबाईल इंटरनेटवरून अत्‍यंत कमी दरात मोबाईल कॉल करता येतात. या सुविधेचा वापर करण्‍यासाठी इंटरनेट वॉईस सर्व्‍हीस (सिप-कॉमेपॅटिल सर्विस), स्काईपी तसेच सिपनेट किंवा युटेलिया वीओआयपी संचलित हॅण्‍डसेट्सची आवश्‍यकता असते.

webdunia
PRPR
फ्रिंग
फ्रिंग ही मोबाइल इंटरनेट सेवा व कम्युनिटी सुविधा आहे. जिच्‍यामुळे 'जीटॉक', 'एमएसएन' तसेच 'याहू मॅसेन्जर' सुविधेशी जोडणी सोईचे होणार आहे. यासोबतच स्काईपी व वीओआईपी सारख्‍या सुविधांना जोडणेही सोईचे होणार आहे.

ई-बड
या सुविधेच्‍या माध्‍यमातून जी टॉक, याहू मॅसेंजर किंवा एमएसएन मॅसेंजर या सारख्‍या सुविधांचा वापर करणे शक्‍य होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi