Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून एटीएमचा पासवर्ड चार अंकी

म्हणून एटीएमचा पासवर्ड चार अंकी
, शनिवार, 23 एप्रिल 2016 (13:13 IST)
पैशांच्या व्यवहारासाठी सध्या एटीएम सर्रास वापरलं जातं. आपण रोज वापरत असलेल्या या एटीएमचा पासवर्ड हा चार अंकी असतो. तुमच्या ई-मेल फेसबुक आणि इतर इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड हा कमीतकमी सहा अंकाचा असतो, पण एटीएम पासवर्ड चार अंकी असण्यामागे एक रोमांचक कारण आहे. एटीएमचा शोध लावला तो जॉन एड्रियन शेफर्ड-बेरॉन यांनी. जॉन यांनी एटीएमचा पासवर्ड सहा अंकी ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्यांच्या बायकोमुळे हा प्रस्ताव जॉन यांना मागे घ्यावा लागला. जॉन यांची पत्नी कॅरोलिनला जास्तीत जास्त चार अंकी संख्या लक्षात राहायच्या. त्यामुळे त्यांनी एटीएमचा पासवर्ड चार अंकी ठेवला.

Share this Story:

Follow Webdunia marathi