Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या 4 गोष्टी सर्च करणे टाळा

या 4 गोष्टी सर्च करणे टाळा
हल्ली कोणत्याही माहितीसाठी सर्वात आधी गुगलचा आधार घेतला जातो. गुगलवर सर्व माहिती उपलब्धही असते. त्यामुळे अनेकजण गुगलचा आधार घेतात. मात्र, गुगलवर अशाही काही गोष्टी आहेत, ज्या सर्च करणं तुम्ही टाळलं पाहिजे. 
 
इमेल आयडी लॉग इन करुन गुगलवर सर्च करु नका. कारण यामुळे तुमचं इमेल आयडी हॅक होण्याची भीती असते. इमेल आयडी हॅक करुन दुरुपयोग केला जातो.
 
गुगलवर संशयास्पद गोष्टींबाबत सर्च करु नका. कारण सायबर पोलिसांची नजर अशा लोकांवर अधिक असते. 
 
गुगल सर्चमध्ये एक अशी सुविधा असते, ज्या माध्यमातून तुमच्या सर्चनुसार जाहिरात दाखवली जाते. कारण गुगलकडे तुमच्या सर्च हिस्ट्रीचा पूर्ण डेटाबेस असतो. यामुळे तुमची माहिती लीक होण्याची भीती असते. शिवाय, सर्चनुसार जाहिरातींचा भडिमारही केला जातो. 
 
औषधांसंबंधी कोणतीही माहिती तुम्ही जेव्हा गुगलवर सर्च करता, त्यावेळी ती माहिती थर्ड पार्टीला ट्रान्सफर केली जाते. याआधारे तुम्हाला उपचारासंबंधी औषधांच्या जाहिराती दाखवल्या जातात. शिवाय, मेडिकलची माहिती क्रिमिनल वेबसाईट्सकडे जाण्याची भीती असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदींमुळे ठरलेलं लग्न मोडल!