Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योग दिनासाठी नवे अँप

योग दिनासाठी नवे अँप
, शनिवार, 11 जून 2016 (11:18 IST)
आंतरराष्ट्रीय योग दिवस जसजसा जवळ येतोय, तसतशी केंद्र सरकारच्यावतीने विविध शासकीय कार्यक्रमांची आखणी केली जात आहे. योग दिनासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने नवीन अँप नुकतेच लाँच केले. मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर हे अँप लाँच करण्यात आले आहे.
 
21 जून रोजी जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाचा 21 जूनचा दुसरा योग दिन असल्यामुळे यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी होत आहे. यंदाच्या योग दिनाला सोशल मीडियाशी कनेक्ट करण्याच्या उद्देशाने हे नवे अँप लाँच करण्यात आले आहे.
 
या अँपमध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँण्ड नॅचरोपॅथी (CCRYN)कडून तयार करण्यात आलेली नियमावली देण्यात आली आहे. तसेच 45 मिनिटांचा योगा तुम्हाला कसा उत्तम आरोग्य देऊ शकतो याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय जीमपेक्षा योगाचे महत्त्व या अँपच्या माध्यमातून पटवून देण्यात आले आहे. हे अँप गुगल प्ले स्टोअरवर सर्व अँन्ड्रॉईडधारकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेअरचॅट हे भारताचे पहिले सोशिअल नेटवर्किंग अॅप